Wed, Sep 19, 2018 22:25होमपेज › Satara › जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ९१.१४ टक्के

जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ९१.१४ टक्के

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 31 2018 1:46AMसातारा : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल  बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. सातारा जिल्ह्यातील 39 हजार 459 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 35 हजार 69 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा एकूण निकाल 91.14 टक्के लागला. 

कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षीपेक्षा सातारा जिल्ह्याचा निकाल 0.40 टक्क्यांनी कमी झाला असून बोर्डातही सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावरून द्वितीय क्रमांकावर गेला आहे. जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा तब्बल 11 टक्क्यांनी जादा असल्याने मुलींनी यंदाही आपले वर्चस्व कायम राखले आहे. बोर्डाने बुधवारी दुपारी मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला.  निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहर व परिसरातील काही इंटरनेट कॅफे व एमएससीआयटी केंद्रावर विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. सातारा जिल्ह्यातील 39 हजार 508 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 39 हजार 459 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर 35 हजार 69 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण 91.14 टक्के निकाल लागला. कला शाखेसाठी 11 हजार 708  विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 9 हजार 270 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा एकूण निकाल 79.18 टक्के लागला.

विज्ञान शाखेसाठी 16 हजार 212 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 15 हजार 819 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञानशाखेचा एकूण निकाल 97.58 टक्के लागला. वाणिज्य शाखेसाठी 8 हजार 512 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 8 हजार 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 95.38 टक्के लागला.

व्यवसाय प्रशिक्षण शाखेसाठी 1 हजार 619  विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 1 हजार 471 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा एकूण निकाल 90.86 टक्के लागला. सर्वच शाखेतील 2 हजार 538 जणांना विशेष प्राविण्य  मिळाले. तर 12 हजार 325 विद्यार्थ्यांना प्रथम, 18 हजार 415विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली.

महाबळेश्‍वर तालुक्यात 562 मुले व 397 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 503 मुले व 380 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 92.08 टक्के लागला. सातारा तालुक्यात 4 हजार 335 मुले व 3 हजार 552 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 3 हजार 929 मुले व 3 हजार 433 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 93.34 टक्के लागला. 

माण तालुक्यात 1 हजार 424 मुले व 1 हजार 449 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 291 मुले व 1 हजार 112  मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 93.39 टक्के लागला. खंडाळा तालुक्यात 1 हजार 185  मुले व 940 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 62 मुले व 917 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 93.13 टक्के लागला. 

फलटण तालुक्यात 2 हजार 295 मुले व 1 हजार 703 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 977 मुले व 1 हजार 630 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 90.22 टक्के लागला. जावली तालुक्यात 460 मुले व 343 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 497 मुले व 322 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 89.54 टक्के लागला. 

वाई तालुक्यात 1 हजार 204 मुले व 1 हजार 235 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 46 मुले व 1 हजार 196 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 91.92 टक्के लागला. कराड तालुक्यात 4 हजार 686 मुले व 3 हजार 737 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 3 हजार 982 मुले व 3 हजार 584 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 89.83 टक्के लागला. 

खटाव तालुक्यात 1 हजार 567 मुले व 1 हजार 412 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 351 मुले व 1 हजार 339 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 90.30 टक्के लागला. पाटण तालुक्यात 1 हजार 582 मुले व 1 हजार 308 मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 311 मुले व 1 हजार 211 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 87.27 टक्के लागला. कोरेगाव तालुक्यात 1 हजार 635 मुले व 1 हजार 340  मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 416 मुले व 1 हजार 290 मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल 90.96 टक्के लागला. 

मुलांचे उत्तीर्णाचे प्रमाण 87.25 टक्के तर मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण 95.90 टक्के आहे. त्यामुळे गतवर्षीच्या निकालाची पंरपरा यावर्षीही मुलींनी कायम राखली आहे.  सातारा जिल्ह्यातील 1 हजार 413 रिपीटर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 1 हजार 408  विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 27.70 टक्के निकाल लागला.