S M L

हा शेरो-शायरींचा अर्थसंकल्प - राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 1, 2017 07:01 PM IST

rahul_gandhi_33

01 फेब्रुवारी :  हा शेरो-शायरींचा अर्थसंकल्प, यात सरकारने शेतकरी आणि तरुणांसाठी काहीच केलं नाहीये. आम्हाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. मात्र सरकारचा अर्थसंकल्प अतिशय किरकोळ आणि साधा फटाका निघाला, अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

संसदेत आज (बुधवारी) सर्वसाधारण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पावरुन विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

राहुल गांधी म्हणाले, अरुण जेटलीचं हे शेरो-शायरींचं अर्थसंकल्प आहे. यंदा सरकारकडून आम्हाला मोठ्या फटाक्यांची अपेक्षा होती. मात्र सरकारच्या या अर्थसंकल्पातून हा साधा फटाका निघाला. या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि तरुणांना काहीच केलं नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत सरकारने जे पाऊल उचललं आहे त्याचं राहुल गांधींनी स्वागत केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 06:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close