ऑरगॅनीक सॉफ्टवेअर काय आहे?
सॉफ्टवेअर कंपनी ज्या प्रकारे असतात, त्यापेक्षा आम्ही जरा वेगळे आहोत. ‘ऑरगॅनीक सॉफ्टवेअर’ संज्ञाचा वापर आम्ही इतरांपासून कसे वेगळे आहोत हे दर्शविण्याकरीता केला गेला आहे:
आमचे सर्वात जास्त प्रचलीत उत्पादन, Firefox, बहुराष्ट्रीय स्थरावरील हजारों वापरकर्त्यांद्वारे बनविले गेले आहे, ज्यामध्ये फक्त काहिक टक्केच कर्मचारी आहेत.
अन्य फायदे किंवा स्टॉकची याऐवजी आम्ही मुक्तपणा, नाविन्यता व वेब वरिल संधी याचा वापर करण्यात अधिक भर देतो (आणखी म्हणजे: आमच्याकडे स्टॉक देखिल नाही).
व विना-नफा, सामाजिक फायदा हेतु संयोजना असल्यामुळे, आम्ही यशाची व्याख्या समाज निर्माण व इतरांच्या उद्धार करीता करतो. आम्ही महाजाळची शक्ति व क्षमता यावर विश्वास ठेवतो व त्याचा फायदा इतरांनाही व्हावा, याकरीता प्रयत्न करतो.
मुक्त स्त्रोत काय आहे?
हे सुरूवातीला समजणे कठिण जाऊ शकते, पण जरा धीर धरा: जास्तीत जास्त व्यक्तिंना आमची “गोपनीय” माहिती प्राप्त व्हावी, असे आमचे मत आहे.
त्यामुळे, आम्ही Firefoxचाच स्त्रोत कोड उघडकीस केला आहे– अगदी मुलभूत & घटक ज्यामुळे Firefox ला कार्यरत होण्यास मदत मिळते ते सगळ्यांना कोड पहाण्यास प्रेरीत करते.
काहिकांनी घटकांमध्ये नाविन्य करीता कोड मधिल त्रुटीचे निर्धारण केले. इतरांकडे नविन गुणविशेष जोडण्याची इच्छा असल्यामुळे त्यास घडवून आणले. व इतरांनी कोड प्राप्त करून, स्वतःचे विचार लागू केले व पूर्णपणे नविन (व उत्कृष्ट) उत्पादन बनविले.
तात्पर्य काय आहे? मुक्तपणा म्हणजे चांगल्या गोष्टी घडतील. कोणिही यात हस्तक्षेप करू शकतो...अर्थात, हस्तक्षेप करीता कुठल्याही प्रकारचे बंधन नाही.
वापरकर्त्याने चिंता का करावी?
आम्ही अशी एकमेव कंपनी आहोत असे नाही, परंतु आम्हाला तुम्हास वेबवर उत्तम सोयी कशी प्रदान करायची: यावर लक्ष असते.
मुक्त असणे म्हणजे पुढिल मोठा विचार कंपनीतील ठराविक मोजक्या कर्मचाऱ्यांपासून न येता कुणाच्याही डोक्यातून येऊ शकतो. जेव्हा तुम्ही वरीलनुरूप विचार करू शकता, तर तीच गोष्ट इतर तऱ्हेने करायची काय आवश्यकता आहे?
ऑरगॅनीक सॉफ्टवेअर व मुक्त स्त्रोत विषयी चर्चा याचा अर्थ आपल्या व 150 दषलक्ष वापरकर्त्यां करीता उत्तम ब्राऊजर पुरविणे आहे. याचा अर्थ उत्तम-दर्जा, अधिक सुरक्षित उत्पादन असे होते. याचा अर्थ उत्पादकीय, स्वतंत्र व सर्वांना प्राप्य असे महाजाळाची निर्माती देखिल होतो.