आम्ही कसे कार्य करतो?
फायरफॉक्स वेगळे कसे आहे? सर्वात महत्वाचे म्हणजे, आम्ही स्वतंत्र आहोत. याचा अर्थ जगातिल कोणताही व्यक्ति (व हजारो तज्ञ आमच्या पाठाशी दरवेळी असतात) कोड पाहू शकतो व त्यामधिल त्रुटी ओळखून आम्हाला कळवू शकतो.
व त्रुटी विषयी माहिती प्राप्त होताच, आम्ही त्याच्या निर्धारण करीता तातडीने कार्यास लागतो. हे तुमच्यावर अवलंबून (व आमच्याही) आहे की समस्या आढळल्यास त्याची तुम्ही काळजीपूर्वक दखल घ्याल, कार्य कार्यरत करतेवेळी जरी आम्ही कमी पडत असलो तेही आम्हाला कळवा.
सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे, तुमची सुरक्षा आमची मुख्य प्राधान्यता आहे.

आमची एक कार्यपध्दती आहे.
आमचे इतरांच्या तुलनेत माहितीजाळावर खूप प्रेम आहे. परंतु, स्कॅमर, स्पॅमर व वायरस निर्माण करणाऱ्यांपासून नेहमीच धोका असतो, त्यामुळे तुम्ही वेबचा वापर करतेवेळी काळजी घ्या अशी विनंती आहे.
येथेच फायरफॉक्स निदर्शणास येतो.
याचे वापर म्हणजे वेब संचार करण्याचा सुरक्षित मार्ग आहे:
- आम्ही स्वतः एकटे अडचणीचे निर्धारण करत नाही. सुरक्षा तज्ञाचा एक जागतिक समुह चोवीस तास तुमचे संचार सुरक्षीत करण्याकरीता कार्यरत राहते (याकरीता मुक्त स्त्रोत कार्यपध्दतीस धन्यावाद द्यावा). याचा अर्थ तुमच्यावर नेहमी प्रशिक्षीत व्यक्तिंची नजर राहते.
- आम्ही प्रत्येकवेळी तुमची सुरक्षा गृहीत धरतो.सुरक्षा तज्ञ कोड लिहीण्यापूर्वीच संभाव्य अडचण व त्यापासून निर्मीत अडचणींवर लक्ष देतात.
- आम्ही समस्या आढळल्यास वर्चस्व पदी राहतो.आम्ही सतत अडचण व नविन फायरफॉक्स अद्ययावत प्रकाशीत करत राहतो व नेहमी एक पाऊल पुढे राहतो. मुक्त स्त्रोत जगात कुणिही तुम्हाला ओळखू शकते व संभाव्य समस्या ओळखण्यास मदत करते.
ऑनलाइन असतेवेळी फायरफॉक्स तुम्हाला कसे सुरक्षित ठेवते या करीता, आमच्या सुरक्षा ब्लॉग वर जा.